नवी दिल्ली : अण्णा द्रमुक पक्षाच्या शशिकला समर्थक गटाचे प्रमुख म्हणून काम करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच दिल्याचा प्रकरणात टीटीव्ही दिनकरन यांना अटक करण्यात आलीय.
दिल्ली पोलिसांनी चार दिवस दिनकरन यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. चेन्नईत झालेल्या पोट-निवडणुकीच्या वेळी अण्णा द्रमुकचं अधिकृत निवडणूक चिन्ह शशिकलांच्या गटालाच मिळावं, यासाठी दिनकरन यांनी त्यांच्या साथीदाराकरवी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देऊ केली.
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिनकरन यांचा साथीदार मल्लीकार्जुन यालाही अटक केलीय. शिवाय चंद्रशेखर हा निवडणूक आयोग आणि दिनकरन यांच्यातला मध्यस्थ याआधीच तुरूंगात आहे. आता दिल्ली पोलिस या तिघांनाही एकत्र बसवून पैशाच्या देवाण-घेवाणीसंदर्भात चौकशी करणार आहे.