मोदीजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कॅम्प उद्धवस्त करा - बाबा रामदेव

जम्मू कश्मीरमधील उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय. योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील या घटनेचा निषेध करत म्हटलं आहे की, 'जर देशात शांती कायम करायची असेल तर आधी Pokमधल्या पाक प्रायोजित दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करावं लागेल.'

Updated: Sep 22, 2016, 05:31 PM IST
मोदीजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कॅम्प उद्धवस्त करा - बाबा रामदेव title=

नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमधील उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय. योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील या घटनेचा निषेध करत म्हटलं आहे की, 'जर देशात शांती कायम करायची असेल तर आधी Pokमधल्या पाक प्रायोजित दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करावं लागेल.'

रामदेव बाबांनी म्हटलं की, 'पीएम मोदी जे करत आहे ते योग्य करत आहेत. पण त्यांना पाकिस्तानमधील दहशतवादी कॅम्पला आधी नष्ट करावं लागेल. लोकं पीएम मोदी यांना एक ताकतवर नेता म्हणून पाहतात.'