रायपूर : छत्तीसगड राज्यात महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या बलात्कार आणि निर्घृण हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. कोंडागाव जिल्ह्यातील बयानार भागातील जंगलात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. नराधमांनी मुलीचे अपहरण केले. तिच्या डोळ्यात आणि तोंडात 'फेवीक्विक' टाकून तिच्यावर सामूहीक बलात्कार करून तिची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून फरार झाले. मुलीच्या मृतदेहाजवळ सेक्स पॉवर वाढवण्याच्या टॅबलेट्स देखील सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
- ही घटना 22 जुलैची (शुक्रवार) आहे. मुलगी सकाळी शाळेत जायला निघाली होती.
- बयानार माध्यमिक स्कूलची 7वीची विद्यार्थिनी होती.
- शुक्रवारी सकाळी ती मित्र-मैत्रिणींसोबत शाळेत जाण्यासाठी सायकलीने निघाली होती. तिची शाळा घरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.
- रस्त्यात तिच्या सायकलचे टायर पंक्चर झाले. तिचे मित्र-मैत्रिणी पुढे निघून गेले होते. ती रस्त्यावर एकटीच होती. नंतर ती शाळेतही पोहचली नाही व घरीही परतली नाही.
- संध्याकाळचे 6 वाजले तरी मुलगी घरी न परतल्याने तिचे आई-वडील चिंतातूर झाले होते. त्यांनी तिचा शोध घेतला.
- मुलीचे वडील मन्हेर सोरी हे शाळेच्या मार्गाने निघाले असता रस्त्यावर मुलीची बॅग दिसली.
- काही अंतरावर असलेल्या जंगलात तिचे कपडे सापडले व तेथून काही अंतरावरच मुलीचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला.
- रस्त्यावर मुलगी एकटी पाहून नराधमांनी तिला हेरले. तिला ओढतच जंगलात नेले. तिच्यावर बलात्कार केला. नंतर डोळ्यात, तोंडात त्यांनी फेव्ही क्विक टाकून तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.