धक्कादायक, गर्लफ्रेंडची ७० हजारांना बोली

बॉयफ्रेंडने आपल्या अकरावीतील गर्लफ्रेंडचे अपहरण करीत तिला ७० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील रामपूर येथे घडली. 

PTI | Updated: Jan 14, 2016, 01:01 PM IST
धक्कादायक, गर्लफ्रेंडची ७० हजारांना बोली title=
संग्रहित

लखनऊ : बॉयफ्रेंडने आपल्या अकरावीतील गर्लफ्रेंडचे अपहरण करीत तिला ७० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील रामपूर येथे घडली. 

रामपूरमध्ये इयत्ता अकरावीत ही मुलगी शिकत आहे. बदायू जिल्ह्यातील तिघांनी या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर  बॉयफ्रेंडने एका लिलावात ७० हजार रुपयांना विकले. संभल जिल्हा पोलिसांनी या मुलीची सुटका केली त्यावेळी ही बाब उघड झाली.

बदायू जिल्ह्यातील तिघांनी अपहणाचा रचला. त्यांनी मुलीला पळवून एका गावात चार दिवस कोंडून ठेवले. त्यानंतर तिला ७० हजार रुपयांना विकले. याबाबत तेथील ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

दरम्यान, तिघे आरोपी तेथून पळून गेलेत. अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  हे प्रकरण रामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलंय.  तसेच पोलिसांनी आरोपींच्या घरी छापे टाकले आहेत. मात्र, कोणीही सापडले नाही.