www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोने दराने पुन्हा 30 हजारी गाठली आहे. सोन्याला पुन्हा तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील ग्राहकांची मागणीमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सोने दरवाढीसाठी जागतिक बाजारातील तेजीही कारणीभूत असल्याचे म्हटले जाते आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात स्टॉकिस्टांनी लग्नसराईच्या काळात मागणी वाढल्याचे दिसत आहे. परिणामी, दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या भावाने तीन आठवड्यांनंतर ३0 हजारांचा दर प्रती तोळा गाठला आहे.
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव 0.9 टक्क्याने उंचावून 1,329.92 डॉलर प्रतिऔंस राहिला. गेल्या 24 मार्चनंतरचा हा उच्चांक होता. चांदीचा भाव0.5 टक्क्याने वधारून 20.09 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 220 रुपयांनी उंचावून अनुक्रमे 30.200 रुपये आणि 30,000 रुपये प्रतितोळा झाला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.