दोन दिवस बघा वाट, पेट्रोल-डिझेल आणखी होऊ शकतं स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळं १६ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. तेल कंपन्या प्रत्येक पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय किमती किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरानुसार पेट्रोल आणि डिझेल्या किमतीत बदल करत असतात. 

Updated: Aug 13, 2015, 11:22 PM IST
दोन दिवस बघा वाट, पेट्रोल-डिझेल आणखी होऊ शकतं स्वस्त title=

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळं १६ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. तेल कंपन्या प्रत्येक पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय किमती किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरानुसार पेट्रोल आणि डिझेल्या किमतीत बदल करत असतात. 

कंपन्यांनी यापूर्वी तीन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात केलीय. या महिन्याच्या पहिल्या तारखेलाच पेट्रोलचे दर २.४३ रुपये आणि डिझेल ३.६० रुपयांनी स्वस्त झालं होतं. 

आता तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर तीन ते चार रुपयांनी कमी करू शकतात. इराणवरील प्रतिबंध हटवल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे आता आणखी कमी होण्याची गरज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.