मुंबई : जगप्रसिद्ध योगगुरु बी.के.एस. अय्यंगार यांना गुगलनं डुडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे. अय्यंगार यांच्या 97 व्या जयंतीदिनाचं औचित्य साधत गुगलनं होमपेजवर योगाचे डुडल ठेवलंय. यामध्ये गुगलनं अय्यंगार यांना ऍनिमेटेड रुपात योगा करताना दाखवलंय.
व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली
१४ डिसेंबर १९१८ रोजी दक्षिण भारतातील कर्नाटकमध्ये जन्म झालेल्या अय्यंगार यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून योगाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. वयाच्या 19 व्या वर्षापासून भारतात तर 1954 पासून परदेशात योगाचे धडे देण्यास अय्यंगार यांनी सुरुवात केली. योग कौशल्यानं अय्यंगार यांनी देशातच नाही तर परदेशात मानाचं स्थान मिळवलं.
2004 साली टाईम्सनं जगातल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये अय्यंगार यांचा समावेश केला. तर 2014मध्ये केंद्र सरकारनं त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवलं. 20 ऑगस्ट 2014 मध्ये अय्यंगार यांचं पुण्यात निधन झालं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.