हैदराबाद : पती दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने क्रूरपणे हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडलीये. रुपेश कुमार अग्रवाल असं या आरोपी पतीचे नाव आहे.
कुमारची पत्नी सिंथिया मूळची दक्षिण आफ्रिकेची होती. काँगोमध्ये असताना रुपेश आणि सिंथिया हे जवळ आले. त्यानंतर २००८मध्ये या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर हे दोघे हैदराबादला आले.
येथे आल्यानंतर सिंथिया हिची फ्रेंच तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. या दोघांनी तर चक्क लग्न करण्याचाही निर्णय घेतला. याची खबर सिंथियाचा पती रुपेशला लागली.
यावेळी संतप्त झालेल्या रुपेशने सिंथियाची हत्या केली. इतकेच नव्हे तर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते जाळून टाकले. दरम्यान, या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केलीये.