मुंबई : देशातच राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारलीय.
आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांमध्ये देशी कंपन्यांमध्ये काम करण्याचं आकर्षण वाढताना दिसतंय. देशातच नोकरी करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या १.२५ लाख डॉलर वार्षिक पगाराच्या नोकरीवर पाणी सोडलंय.
देशातील प्रमुख इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वार्षिक प्लेसमेंट अभियानामध्ये, प्लेसमेंटच्या पहिल्या सहा दिवसांत या वर्षी कंपन्यांच्या कॅम्पस संधीमध्ये ३० टक्के वाढ झालेली दिसून आलीय.
दिल्ली आयआयटीच्या म्हणण्यानुसार, या काळातच जवळपास ५० टक्के बॅचला नोकरी मिळाल्यात. अनेक विद्यार्थ्यांनी १.२५ लाख डॉलर वार्षिक मूळ पगाराच्या आंतरराष्ट्रीय पॅकेज धुडकावलेत, असंही यात म्हटलं गेलंय. याऐवजी, या विद्यार्थ्यांनी त्याच कंपनीच्या भारतीय ब्रांचमध्ये किंवा इतर कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी स्वीकारलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.