पश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी

पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.

Updated: Oct 29, 2015, 11:09 AM IST
पश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.

नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कोलकातापासून ३५० किलोमीटरवर असलेल्या वीरभूमि जिल्ह्यातील नलहाटी गावात हिंदूंना नवरात्रौत्सव साजरा करता येत नाही. रिपोर्टनुसार स्थानिक लोकांनी अनेक वेळा याबाबत परवानगी मागितली. मात्र अज्ञात कारणांनी प्रत्येक वेळी त्यांची मागणी फेटाळून लावली जाते.

आणखी वाचा - हिंदू मुलीशी इखलाकच्या मुलाचे संबंध म्हणून दादरीकांड

न्यूज एक्सच्या रिपोर्टनुसार, गावांत राहणाऱ्या मुस्लिम समाजानं हिंदूंना नवरात्रौत्सव साजरा न करण्यासाठी दबाव टाकलाय. स्थानिक लोकांनी ऑन रेकॉर्ड हे सांगितलंय. स्थानिक प्रशासनानं सांगितलं की, जर हिंदूंना दुर्गापूजेच्या आयोजनाची परवानगी दिली तर गावांत सांप्रदायिक तणाव पसरले.

न्यूज एक्सच्या रिपोर्टनुसार, गावातील स्थानिक मुस्लिम समुदायाचं म्हणणं आहे की, जर दुर्गा पूजेला परवानगी दिली तर त्यांना गौहत्येची पण परवानगी द्या. रिपोर्टनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात मौन साधलंय. 

आणखी वाचा - दादरीमधील घटना ही पूर्वनियोजित : अल्पसंख्याक आयोग

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.