नवी दिल्ली : आपने दिल्लीतील विजयाचं सेलिब्रेशन साजर केलं आणि आज त्यांना इनकम टॅक्स विभागाकडून 2 कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप‘ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
केजरीवाल यांच्या पक्षाने काळापैसा व्यवहारात आणल्याचा दावा आवाम या संस्थेने केला होता. ‘आप‘ने 50 लाख रुपयांची रोकड देऊन कंपन्यांकडून चेक घेतला आणि त्या मोबदल्यात कमिशन मागितले होते, असा आरोप त्यांच्यावर आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी व्हॉलेंटियर अॅक्शन मंच म्हणजेच आवामकडून ‘आप‘ने गोळा केलेल्या निधीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आवामने ही तक्रार प्राप्तीकर विभागाकडे केली होती. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने गोल्डमाईन, सनव्हिजन, स्कायलाईन, इन्फोनेन्स या कंपन्यांकडून मिळालेल्या पैशांबाबत ‘आप‘ने उत्तर द्यावे अशी सूचना केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.