नवाब असूनही सैफच्या वडिलांना नावातून उपाधी का काढावी लागली? जाणून घ्या यामागील सत्य

Mansoor ali khan: काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला. सैफची प्रकृती आता सुधारत आहे. या दरम्यान त्याच्या वडिलांच्या नावाचा एक किस्सा चर्चेत आला आहे. काय आहे हे प्रकरण पाहूयात. 

Updated: Jan 21, 2025, 04:42 PM IST
नवाब असूनही सैफच्या वडिलांना नावातून उपाधी का काढावी लागली? जाणून घ्या यामागील सत्य title=

पतौडीहून खान कसे झाले सैफचे वडील?

सैफ अली खान यांचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांना एकेकाळी 'नवाब' म्हणून ओळखलं जात असे. मात्र 1971 साली भारत सरकारने सर्व राजवटींचे खाजगीकरण रद्द केल्यावर त्यांच्या नावातील 'पतौडी' आणि 'नवाब' ही उपाधी काढून टाकावी लागली. सैफने अरबाज खानच्या एका टॉक शोमध्ये याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला की, त्यांच्या वडिलांना ही उपाधी नावासोबत लावणे बंद करावे लागले.

1971 मध्ये काय घडलं?

सैफने एका मुलाखतीत सांगितलं की, '1971 साली भारतातील सर्व राजवटी संपुष्टात आणल्या होत्या. त्याच वर्षी सर्व राजवटी बेकायदेशीर असल्याची घोषणा केली. त्याच वर्षी माझ्या वडिलांना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारपददेखील गमावलं होतं. सैफच्या वडिलांनी त्याच वेळी त्यांच्या नावातील ‘पतौडी’ ही पदवी सोडावी लागली होती. त्यानंतर त्यांना फक्त 'खान' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.' भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज व्यक्ती असलेल्या सैफच्या वडिलांचे 22 सप्टेंबर 2011 रोजी निधन झालं.

सैफ अली खानची प्रतिक्रिया

सैफने सांगितलं की, 'मी पाच वर्षांचा असताना मी वडिलांना विचारलं होतं की तुमचे दोन वेगवेगळे नाव का आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की, 1971 च्या आधी त्यांचं नाव मन्सूर अली खान पतौडी होते, पण राजवटी संपल्यानंतर त्यांनी फक्त 'खान' ठेवलं. मग आता तू देखील खानचं आहेस." पुढे सैफ म्हणाला "ही गोष्ट जाणून घेणे महत्वाचे आहे पण मला नवाब बनून राहण्याची अजिबात इच्छा नाही, मला पतौडी नाव खूप आवडत असेल तरी सर्वप्रथम मी स्वतःला एक अभिनेता मानतो.” सैफ अली खानचे हे वक्तव्य त्यांच्या वडिलांच्या जीवनातील मोठ्या बदलाबद्दल सांगते.

हे ही वाचा: 'कांतारा चॅप्टर 1' वादाच्या भोवऱ्यात; शुटिंगला गावकऱ्यांचा विरोध, नेमकं काय झालंय?

सैफच्या कुंटुंबातील नावांचे वाद

सैफच्या वडिलांना नाव आणि सही दोन्हीमधून पतौडी ही उपाधी काढावी लागली. त्यानंतर या नवाब वंशात सैफ करीनाचा मोठा मुलगा तैमूर याच्या नावामुळेदेखील वाद निर्माण झाला होता. याबाबत सैफ म्हणाला की, "आम्ही तैमूरचं नाव बदलण्यावर नक्कीच विचार करणार," हा वाद सध्या शांत झाला आहे. सैफच्या मुलाच्या नावात कोणता बदल झाला नसून त्याचं नाव अजूनही तैमूर असेच आहे. तो चाहत्यांमध्ये एक लोकप्रिय स्टारकिड आहे.