Kantara chapter 1 Upcoming Movie: 'कांतारा' हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं शुटिंग सध्या सुरु आहे. या चित्रपटाचं शूटिंग कर्नाटकातील एका गावामध्ये सुरु आहे. पण या यावेळी शूटिंगदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. जंगल आणि प्राण्यांना इजा पोहोचवल्याच्या आरोपावरून स्थानिक लोकांनी ही शूटिंग थांबण्याची मागणी केली आहे. काही महिन्यांपूर्वी देखील या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. तेव्हा कोल्लुरहून 'कांतारा चॅप्टर 1' च्या एका सीनचं शूटिंग पूर्ण करून परत येणाऱ्या बसचा अपघात झाला होता. या अपघातमध्ये 6 जूनियर आर्टिस्टना इजा झाली होती. आता पुन्हा या चित्रपटाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
'कांतारा चॅप्टर 1'च्या शूटिंगदरम्यान कर्नाटकच्या गवीगुड्डा भागात हा वाद उफाळला आहे. काही रिपोर्टनुसार, स्थानिक लोकांनी चित्रपटाच्या निर्मात्यावर जंगलांना आणि तिथल्या प्राण्यांना नुकसान पोहोचवल्याचा आरोप केला आहे. स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार, शूटिंगदरम्यान जास्त प्रमाणात स्फोटकांचा (एक्सक्लॉसिव्ह) वापर केल्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
जिल्हा पंचायतीच्या सदस्य सना स्वामी यांनी देखील आरोप केला आहे की, "या शूटिंगमुळे पक्ष्यांना आणि प्राण्यांना त्रास होतोय". आधीच शेतकरी हत्तींच्या हल्ल्यामुळे त्रस्त आहेत आणि आता जंगलांच्या संरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचं पालन होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
हे ही वाचाः सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला 'नुसता खिलाडी तर...'
शूटिंगदरम्यान स्थानिक लोक आणि चित्रपटाच्या क्रू मेंबर्स यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की एका युवकाला दुखापत झाली. त्याला सकलेशपूर येथील क्रॉफर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी येसलूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वादाबाबत पोलिसांनी अजून कोणत्याच तपासाची माहिती दिलेली नाही. याशिवाय प्राण्यांना आणि वनसंपदेला क्षति पोचवल्याच्या आरोपांबद्दल चित्रपटाचे मेकर्स किंवा ऋषभ शेट्टी यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.