सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला 'नुसता खिलाडी तर...'

Akshay Kumar on Saif Ali Khan: 16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानच्या घरात घुसून चोराने हल्ला केला होता. कुटुंबाला वाचवताना सैफ अली खान गंभीर जखमी झाला.   

शिवराज यादव | Updated: Jan 21, 2025, 03:35 PM IST
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला 'नुसता खिलाडी तर...' title=

Akshay Kumar on Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपला आगामी चित्रपट 'स्काय फोर्स'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 24 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकतंच अक्षय कुमारने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल विचारण्यात आलं. यावेळी अक्षय कुमारने सैफ अली खानच्या शौर्याचं कौतुक केलं आहे. 

16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानच्या घरात घुसून चोराने हल्ला केला होता. कुटुंबाला वाचवताना सैफ अली खान गंभीर जखमी झाला. सैफ अली खानवरील हल्ल्यावर बोलताना तो म्हणाला की, "तो सुरक्षित आहे ही फार चांगली बाब आहे. हे फार चांगलं आहे. आम्ही आनंदी आहोत. संपूर्ण इंडस्ट्रीला तो सुरक्षित आहे याचा आनंद आहे. त्याच्या शौर्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याने आपल्या कुटुंबाची सुरक्षा केली आहे. त्याला माझा सलाम".

यावेळी अक्षय कुमारने सैफ अली खानसह चित्रपट करण्यावरही भाष्य केलं. तो म्हणाला की, "मी त्याच्यासह 'मै अनाडी, तू खिलाडी' चित्रपट केला आहे. पण जर आम्ही पुढच्या वेळी एकत्र काम केलं तर त्याचं नाव 'तू खिलाडी' असेल".

दरम्यान सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल बोलायचं गेल्यास त्यात सुधारणा झाली आहे. लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आज त्याला डिस्चार्ज मिळणार आहे. सैफ अली खानवर दोन सर्जरी झाल्या आहेत. यावेळी पाठीच्या कण्यातून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. 

'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

'स्काय फोर्स' चित्रपट 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. अभिषेक कपूर आणि संदीप केव्लानी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातून वीर पहाडिया पदार्पण करत आहे. वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा नातू आहे.