घरात शौचालय असल्यास होणार पगारवाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वच्छ भारत अभियान हरियाणा सरकारनंतर आता राजस्थानमध्येही गंभीररित्या घेतलं आहे. हरियाणानंतर आता राजस्थानमध्येही घरात शौचालय असलं तरच सरकारी कर्मचाऱ्याचा वेतनवाढ होणार आहे. असा नियम या दोन्ही राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.

Updated: Nov 30, 2015, 10:32 PM IST
घरात शौचालय असल्यास होणार पगारवाढ title=

राजस्थान : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वच्छ भारत अभियान हरियाणा सरकारनंतर आता राजस्थानमध्येही गंभीररित्या घेतलं आहे. हरियाणानंतर आता राजस्थानमध्येही घरात शौचालय असलं तरच सरकारी कर्मचाऱ्याचा वेतनवाढ होणार आहे. असा नियम या दोन्ही राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.

राज्य सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरात शौचालय आहे का याचं प्रमाणपत्र मागितलं आहे. देशभरात सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाबाबत दोन्ही सरकार अधिक गंभीर असल्याचं दिसतंय. 

दोन्ही राज्यातील सरकारने लोकांना घरात शौचालय बनवण्याचं आवाहन केलं आहे. अभियानाला यशस्वी करण्यासाठी लोकांना पैसे देखील दिले जात आहे. जो सरकारी कर्मचारी घरात शौचालय असल्याचं प्रमाणपत्र देईल त्या कर्मचाऱ्याच्या वेतन वाढीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल असं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलं आहे. 

या आधी हरियाणा सरकारने उघड्यावर शौचास न जाणाऱ्या व्यक्तीला नोकरी देण्याचा नियम लागू केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.