भारताची आकाशी झेप, मोजक्या देशांच्या यादीत

नेव्हिगेशन उपग्रह असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत आता भारतानं स्थान पटकावलंय. IRNSS-1A या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण काल रात्री झालं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 2, 2013, 12:12 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, श्रीहरीकोटा
नेव्हिगेशन उपग्रह असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत आता भारतानं स्थान पटकावलंय. IRNSS-1A या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण काल रात्री झालं.
श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी २२ या प्रक्षेपणयानानं हा सॅटेलाईट आपल्या कक्षेत स्थीर केला. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे पीएसएलव्हीची वादातीत कार्यक्षमता स्पष्ट झाल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे संचालक के. राधाकृष्णन यांनी म्हटलंय.
संपूर्ण भारतीय बनावटीच्या या उपग्रहामुळे रशिया, अमेरिका, यूरोपीयन युनियन आणि चीनच्या पंगतीत जाऊन बसण्याचा मान भारताला मिळाला आहे.