www.zee24taas.com, झी मीडिया, जोधपूर,
दिल्ली पोलिसांच्या पथकाला पाटणा स्फोटाचा मास्टरमाईंड तहसीनला राजस्थानमधून अटक करण्यात यश मिळवलंय. तहसीन उर्फ मोनू भारतातील इंडियन मुजाहिद्दीनचा कमांडर होता.
राजस्थानमध्ये तो टुरिस्ट गाईड म्हणून राहत होता. तहसीन पाकिस्तानला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी त्याला अटक करण्यात आली. यासिन भटकळच्या अटकेनंतर तहसीन अख्तर इंडियन मुजाहिद्दीनमध्ये त्याची जबाबदारी सांभाळत होता.
तहसीननेच पटना आणि गया मध्ये झालेल्या सिरियल बॉम्बस्फोटांचे नियोजन केल्याचे समजतंय. दोन दिवसांपूर्वीच इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशहवाद्यांना जोधरपूरमध्ये पकडण्यात आलंय. त्यापाठोपाठ दिल्ली पोलिसांना मिळालेलं एक मोठं यश आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.