आता इंडिगो देतेय ९९९ रुपयात तिकीट

स्पाइसजेटनंतर आता इंडिगोनं सुद्धा स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवी स्कीम लॉन्च केलीय. मंगळवारी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तिकीटावर सूट देत ही योजना सुरू झाली. 

Updated: Sep 2, 2014, 10:45 PM IST
आता इंडिगो देतेय ९९९ रुपयात तिकीट title=

मुंबई: स्पाइसजेटनंतर आता इंडिगोनं सुद्धा स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवी स्कीम लॉन्च केलीय. मंगळवारी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तिकीटावर सूट देत ही योजना सुरू झाली. 

या स्कीममध्ये ९९९ रुपयांत एका बाजूचा विमान प्रवास तुम्ही करू शकाल. विशेष म्हणजे यात सर्व करांचा समावेश आहे. एका दिवसापूर्वी स्पाइसजेटनं ४९९ रुपये तिकीटाची योजना सुरू केली होती. 

इंडिगोनुसार दिल्ली-जयपूर विमान प्रवास ९९९ रुपये ठेवला गेलाय. तर श्रीनगर-चंदीगढ फ्लाइटचं भाडं १,३९९ ठेवलंय. बंगळुरू-दिल्ली फ्लाइटचं भाडं ४,८२९ रुपये आहे. या स्कीम अंतर्गत प्रवासाच्या ९० दिवसांपूर्वी तिकीट बुक करावं लागेल. 

स्पाइसजेटच्या स्कीम नुसार तिकीटांचं बुकिंग १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०१४ दरम्यान केलं जावू शकतं. तर १६ जानेवारी ते २४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत प्रवास केला जाऊ शकेल.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.