आयआरसीटीसीकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी पाण्याची मदत

जम्मू-काश्मीरमध्ये पूरामुळं हा:हाकार माजलाय. केंद्र सरकारकडून तसंच प्रत्येक राज्यातून मदतीचा हात भारताच्या या स्वर्गाला दिला जातोय. आयआरसीटीसीनं सुद्धा पूरग्रस्तांसाठी पाण्याची मदत केलीय.

Updated: Sep 10, 2014, 04:26 PM IST
आयआरसीटीसीकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी पाण्याची मदत title=

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये पूरामुळं हा:हाकार माजलाय. केंद्र सरकारकडून तसंच प्रत्येक राज्यातून मदतीचा हात भारताच्या या स्वर्गाला दिला जातोय. आयआरसीटीसीनं सुद्धा पूरग्रस्तांसाठी पाण्याची मदत केलीय.
हवाई आणि रेल्वेद्वारे पिण्याचं पाणी जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांना आयआरसीटीसीकडून पोहोचवलं जातंय. 

 

  • 7 सप्टेंबर 2014ला 5520 कार्टेन्समधून 66240 पाण्याच्या बॉटल्स रेल्वेनं पाठवल्या गेल्या. 

  • 8 सप्टेंबर 2014ला 2160 कार्टेन्समधून 25920 बॉटल्स, विमानाद्वारे पाठवल्या.

  • 9 सप्टेंबर 2014ला 8334 कार्टेन्समधून 1,00,008 बॉटल्स विमानानं पाठवल्या. 

  • 10 सप्टेंबर 2014ला 8334 कार्टेन्समधून 1 लाख बॉटेल्स पाठवल्या.

 

एकूण पूरग्रस्त भागात 16014 कार्टेन्समधून 1 लाख 92 हजार 168 बॉटेल्स नऊ सप्टेंबरपर्यंत तर 1 लाख बॉटेल्स 10 सप्टेंबरला आयआरसीटीसीनं पाठवल्या आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.