नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन झालंय. ते ८० वर्षांचे होते.
१३ दिवसांपूर्वी मुफ्ती मोहम्मद सईद यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वासोच्छावासासाठी त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं होतं. प्लेटलेट काऊंट कमी झाल्यानंतर त्यांना दात्यांकडून अतिरिक्त प्लेटलेट देण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
शेवटच्या क्षणांत सईद यांच्या अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. मल्टी ऑर्गन फेळ झाल्यानं गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुफ्ती मोहम्मद सईद हे पीडीपीचे संस्थापक होते. पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.