Who Will Be The Next Chief Minister Of Maharashtra: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळवत महायुतीने 232 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र या ऐतिहासिक विजयाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालेलं नाही. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने एकनाथ शिंदेंना विधानसभा बरखास्त करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याने लवकरात लवकर नवा मुख्यमंत्री कोण याची निवड करावी लागणार आहे. असं असतानाच आता मुख्यमंत्रिपदासंदर्भात कोण निर्णय घेणार याबद्दलची माहिती समोर आली आहे. (दिवसभरातील घडामोडींचे LIVE UPDATES पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)
महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आता विचारला जात आहे. महायुतीचा विजय होऊन 72 तास उलटले तरीही राज्यात नवा मुख्यमंत्री आणि नव्या सरकारचा शपथविधी अद्यापही पार पडलेला नाही. भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या विधानावरून दिसून येतंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय अंतिमतः भाजपाचे नेते तसेच गृहमंत्री अमित शहा घेणार असल्याचं कळतंय. दरम्यान, काल देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. मात्र त्यांची भाजप श्रेष्ठींश बैठक झाली की नाही याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर त्यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय. आज रात्रीपर्यंत यावर निर्णय होऊन उद्या सकाळपर्यंत नाव घोषित होईल अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आणि धावता दौरा करुन रात्रीच मुंबईत परतले. मात्र, "राज्याच्या राजकारणा संदर्भात दिल्लीत आज कोणतीही बैठक नाही," असं फडणवीसांनी या दौऱ्याबद्दल बोलताना सोमवारी रात्रीच स्पष्ट केलं. फडणवीसांच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सस्पेन्स पुन्हा एकदा वाढल्याची चर्चा रांगली. "लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलोय आज रात्री माझी कुणाशीही बैठक नाही," असं फडणवीसांनी सांगितलं होतं.
नक्की वाचा >> निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने...; फडणवीसांची 'ती' भेट कारणीभूत
देवेंद्र फडणवीस रात्रीच पुन्हा मुंबईला परतले. आज दिल्लीत महायुतीची बैठक होणार की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता नसली तरी मुख्यमंत्री कोण हे आजच निश्चित होईल असं सांगितलं जात आहे.