नवी दिल्ली : यापुढे तुमच्या जुन्या गाड्या दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक फायदा करून देऊ शकतात. १० वर्षांहून जुन्या गाड्या मोडीत काढल्यास ५ हजारांपासून ६० हजारांपर्यंतचा इन्सेन्टीव्ह देण्याची योजना केंद्र सरकारनं तयार केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
याचा वाहन मालकांना आर्थिक फायदा होईलच पण प्रदूषण नियंत्रण आणि अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी याचा फायदा होईल, असं गडकरी म्हणाले. मालकांनी गाड्या मोडीत काढल्याचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात येईल. त्यावर इन्सेटीव्ह आणि एक्साईजमध्ये सवलत देण्यात येईल. त्यामुळे मोठ्या गाड्यांच्या मालकांना सुमारे दीड लाखांचा फायदा मिळू शकेल.
याखेरीज निवडक ८-१० बंदरांच्या नजिक स्क्रॅपयार्ड प्रकल्प उभारण्यात येतील. यामध्ये जुन्या गाड्या रिसायकल केल्या जातील. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयानं तयार केलाय. तो लवकरच अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
या योजनेनुसार कोणत्या वाहनांना किती इन्सेन्टीव्ह मिळणार?
बाईकला ३ हजार रुपये
कारला ३० हजार रुपये
ट्रकला ६० हजार रुपये
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.