नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लांब असणाऱ बोगदा काश्मीरमध्ये पूर्णत्वास येत आहे. यामुळे जम्मू ते श्रीनगर हा प्रवास कमी वेळात पू्र्ण होऊ शकेल.
नाथा टॉप या डोंगरात अकराशे मीटर खोल तसेच नऊ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यात शेवटचा स्फोट सोमवारी दुपारी केला.
या स्फोटामुळे दोन डोंगरांना जो़डलेली दरड कोसळली. आणि हा बोगदा तयार झाला.
या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे.
म्हणजेच 10 तासांचा हा प्रवास अवघ्या साडेतीन तासांवर येणार आहे, असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
हा बोगदा आधुनिक पद्धतीने बांधण्यात आल्यामुळे बर्फात तसेच पावसाळ्यात प्रवास करणे अतिशय सोइस्कर होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.