बंगळुरू : सरप्राइज गिफ्ट नेहमी लोकांना खूश करणारं असतं. पण बंगळुरूच्या वीज वितरण कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला एका गिफ्टमुळे आनंद नाही झालं तर मोठा धक्का बसला.
कोरिअरने मिळालेले गिफ्टचे पार्सल आनंदाने खोलले तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यात गिफ्ट नव्हते तर होता एक साप... हा साप त्याच्या महिला सहकाऱ्याच्या पतीने पाठविला होता.
मीडियामध्ये आलेल्या बातमीनुसार ही घटना मंगळवारी घडली. कर्मचाऱ्याला गिफ्टसोबत एक पत्र मिळाले. हे पत्र त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिला सहकारीच्या पतीने पाठविले होते आणि त्यात धमकीही दिली होती.
गिफ्टमध्ये लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, 'हिस्स ऑर हर'... यात धमकी दिली होती माझ्या पत्नीपासून दूर राहा. नाही तर या पेक्षाही खतरनाक गिफ्ट पाठवणार असेही यात लिहिले होते.
गिफ्ट पाठविणारा ४८ वर्षीय व्यक्ती असून तो टुमाकुरूमध्ये राहतो. त्याला संशय होता की हा व्यक्ती आपल्या पत्नीशी जवळीक वाढवत आहे. या प्रकरणाची तक्रार कर्मचाऱ्याने पोलिसांकडे केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.