अतिक्रमण हटविण्याच्या वेळी जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी

उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये पोलीस आणि जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी गेलाय. मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलिस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत, तर १५ आंदोलक ठार झालेत. पाच पोलीस गंभीर जखमी झालेत.

Updated: Jun 3, 2016, 11:11 AM IST
अतिक्रमण हटविण्याच्या वेळी जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी  title=

लखनऊ : उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये पोलीस आणि जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी गेलाय. मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलिस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत, तर १५ आंदोलक ठार झालेत. पाच पोलीस गंभीर जखमी झालेत.

दोन वर्षापासून या पार्कातील जागेवर सुभाष सेनेने अतिक्रमण केले होते. न्यायालयाचा आदेश असूनही यापूर्वी पोलिसांना ही जागा रिकामी करुन घेता आली नव्हती. शहरातल्या जवाहर बाग परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू होती. त्यावेळी अतिक्रमण केलेल्यांना हटवण्यासाठी मोठी पोलीस कुमक मागवण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई सुरू करताच जमावानं पोलिसांच्या दिशेनं बेछुट गोळीबार सुरू केला. 

या जमिनीवर अझाद भारत विधीक वैचारिक क्रांती सत्याग्रहीच्या आंदोलकांनी अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशावरून ताबा घेतल्याचं सांगितलं जातंय. या सत्याग्रहींनीच काल पोलिसांवर हल्ला केल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी चौकशीचे आदेश दिलेत, तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. 

जमावाकडून हिंसाचार होत असल्याने जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या आणि अखेर गोळीबार केला. संतोष यादव या एसएचओचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला अशी माहिती दलजीत चौधरी यांनी दिली.