'तारे जमीन पर' फालतू चित्रपट!' युवराज सिंगचे वडील म्हणाले, 'असे चित्रपट पाहत नाही कारण...'

Yograj Singh on Taare Zameen Par : 'तारे जमीन पर' या चित्रपटाला युवराज सिंगचे वडील योगराज सिंग म्हणाले 'फालतू'

दिक्षा पाटील | Updated: Jan 14, 2025, 11:25 AM IST
'तारे जमीन पर' फालतू चित्रपट!' युवराज सिंगचे वडील म्हणाले, 'असे चित्रपट पाहत नाही कारण...' title=
(Photo Credit : Social Media)

Yograj Singh on Taare Zameen Par : लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंगनं ‘जीवे मारण्याच्या’ वक्तव्यावर आणि हिंदी भाषेची खिल्ली उडवल्यानंतर आता बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. योगराज सिंगनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खान आणि दर्शील सफारी यांच्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटावर टीका केली आहे. त्यांनी या चित्रपटाला फालतू चित्रपट म्हटलं आहे. पण ते असं का म्हणाले ते जाणून घेऊया... 

योगराज सिंग यांनी युट्यूबर समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांनी मुलांवर कधी हात उगारला नाही. जेव्हा त्यांना विचारलं की त्यांनी 9 वर्षांच्या युवराज सिंगवर स्टेक्टस फेकले होते. तर त्यांनी सांगितलं की त्याला हात उगारणं नाही बोलत. योगराज सिंग यांनी पुढे सांगितलं की 'वडिलाची जी इच्छा असेल ते तो मुलगा होणार आणि हीच माझी पद्धत आहे.' त्यानंतर समदीशनं योगराजला विचारलं की त्यांनी आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट पाहिला? योगराज म्हणाले की 'पाहिला आहे. खूपच फालतू चित्रपट आहे. मी असे चित्रपट नाही पाहत. यामुळे त्यांच्या डोक्यात काही विचार निर्माण होतात. अशा गोष्टींनी काही होत नाही.'

दरम्यान, ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात ईशानची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्याला डिसलेक्सिया झालेला असतो आणि आमिर खानची भूमिका एक शिक्षकाची असतो जो ईशानला ठीक होण्यासाठी प्रयत्न करतो. त्यात टिस्का चोप्रा देखील दिसली होती. त्यांनी दर्शीलच्या आईची भूमिका साकारली होती. आजही या चित्रपटाची लोकं स्तुती करतात. 

हेही वाचा : आधी गाणी शूट केली अन् नंतर स्क्रिप्ट शोधत बसले; गोविंदाच्या 'या' सुपरहिट चित्रपटाचा अजब रेकॉर्ड

या चित्रपटाचं बजेट हे 12 कोटी होतं. Sacnilk च्या रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानं वर्ल्डवाइड 98.50 कोटींची कमाई केली होती. तर आमिर खान सध्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाच्या सीक्वलवर काम करत आहे. त्यांनी या सीक्वलचं नाव ‘सितारे जमीन पर’ असं असणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जिनिलिया डिसूजा दिसणार आहे. पहिले बा चित्रपट डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट 2025 च्या मिडमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये नवीन कलाकार दिसणार आहेत आणि पटकथा देखील दुसरी असणार आहे. ‘तारे जमीन पर’ पासून हा चित्रपट खूपच वेगळा असणार आहे.