अहमदाबाद : दक्षिण गुजरातला रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाची तीव्रता रिश्टर सेक्लवर 4.7 इतकी मोजण्यात आली.
सूरतपासून १४ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.
आज सकाळी आठच्या सुमारास मणिपूरलाही भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. याठिकाणीही हानी झाल्याचे वृत्त नाही.