www.24taas.com , झी मीडिया, हैदराबाद
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हैदराबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मोदी आज आपल्या ‘ट्विटरवाल्या आई’ला भेटणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींची ‘ट्विटरवाली आई’ खास जर्मनीहून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी हैदराबादसा आलीय.
नरेंद्र मोदींना आपला पाचवा मुलगा मानणारी ही ८५ वर्षीय मेरी सिंह बैस आहे मोदींची ट्विटरवाली आई. हैदराबादमध्ये होणाऱ्या रॅलीबाबत आणि जाहीर सभेबाबत बैस यांना माहिती मिळताच त्यांनी जर्मनीमध्ये राहणारा आपला मुलगा आर. एस. बैसजवळ मोदींच्या रॅलीला उपस्थित राहण्याची इच्छा दर्शविली. आर.एस. बैस यांनी ट्विटकरुन मोदींना आईची इच्छा सांगितली. मोदींना याबाबत माहिती मिळताच त्यांनी ट्विटरवरुन मेरी यांना हैदराबादला आणण्याचं आश्वासन दिलं.
मेरी सिंह यांना जर्मनीतून हैदराबादला आणण्याचे आदेश मोदींना आंध्रप्रदेशातील भाजपचे अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना दिल्याचं समजतंय. शिवाय मेरी यांना अशा ठिकाणी बसवावं जिथून त्यांना मोदींची भेट घेता येईल, असंही समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार मेरी सिंह आपली मुलगी कंवलजीत सोबत मोदींच्या या सभेला हजर राहणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.