IND vs END: रोहित शर्माच्या तुफानी शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 33 चेंडू शिल्लक असताना 305 धावांचे लक्ष्य गाठले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. भारताने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 4 विकेट्सने जिंकणाऱ्या टीम इंडियाने दुसरा सामनाही 4 विकेट्सने जिंकला. कटकमधील बाराबती स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव शेवटच्या षटकात 304 धावांवर आटोपला. कर्णधार रोहित शर्माच्या झंझावाती शतकाच्या मदतीने भारताने 45 व्या षटकातच सामना जिंकला.
डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. 35 धावांत त्याने इंग्लंडचे तीन महत्वाचे बळी घेतले. ज्यामुळे टीम इंडियाच्या मधल्या षटकांमध्ये त्यांची पकड मजबूत करण्यास मदत झाली. चांगल्या फलंदाजीच्या खेळपट्टीवर जडेजाने आक्रमक बेन डकेट (65) ला बाद केले आणि जो रूट (69) ला तंबूत पाठवले. इंग्लंडची सुरुवात भक्कम झाली पण जडेजाने त्याला सुरुंग लावत मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यापासून रोखले.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने डकेट, रूट आणि कर्णधार जोस बटलर (34) यांच्या योगदानाने इंग्लंडने चांगला पाया रचला. इंग्लंडचा स्कोअर 35 षटकांत 3 बाद 200 धावा होता. ज्यामुळे संघ 330 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी होईल असे वाटत होते. पण जडेजाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे त्यांचा धावगती नियंत्रित राहिली. लियाम लिव्हिंगस्टोनने 32 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 41 धावा आणि आदिल रशीदने पाच चेंडूत 14 धावा केल्या नसत्या तर धावसंख्या या पातळीवर पोहोचली नसती.
2ND ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/NReW1eEQtF #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 9, 2025
रोहित शर्माने 76 चेंडूत शतक ठोकले. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माने शानदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त 76 चेंडूत त्याचे 32 वे शतक पूर्ण केले. याआधी तो खराब फॉर्ममध्ये दिसला होता. 13 एकदिवसीय डावांनंतर शतक ठोकून हिटमनने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.