Sanjeevraje Naik Nimbalkar: साताऱ्यातील संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्या घरी सुरु आयकर विभागाची चौैकशी सुरु होती. तब्बल पाच दिवसांपासून ही चौकशी सुरु होती. अखेर चौकशी पूर्ण आयकर विभागाचे अधिकारी निंबाळकर यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. साताऱ्यासह निंबाळकर यांच्या पुण्यातील निवसस्थानी देखील चौकशी सुरु होती.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आयकर विभागाने संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सुरू केलेली चौकशी अखेर पाचव्या दिवशी संपली. 5 फेब्रुवारी रोजीआयकर विभागाचे कर्मचारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी, पुण्यातील निवासस्थानी , गोविंद मिल्क डेअरी वर चौकशीसाठी दाखल झाले होते. चौकशी सुरु असताना पाच दिवसापासून संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक देखील होते ठिय्या मांडून होते.
आयकर विभागाकडून निंबाळकरांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. निंबाळकरांच्या फलटण येथील घरावर आयकर विभागाने छापा टाकला. यावेळी संजीवराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयकर विभागानं अनेक प्रश्न विचारले. त्यांच्याजवळील अनेक कागदपात्रांची चौकशी करण्यात आली. चौकशीत काहीही सापडलं नसल्याची माहिती संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. माझ्याकडून काहीही जप्त केलं नाही. ही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती. गोविंद मिल्क संदर्भात ही कारवाई होती असे देखील निंबाळकर यांनी सांगितले.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधु संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं धाड टाकली...या धाडीमुळे फलटण शहरात एकच खळबळ उडाली... संजीवराजे नाईक निंबाळकरांचं डेअरी उत्पादनांचा आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुद्धा आहे...या धाडीमुळे चर्चांना उधाण आलंय...सोबतच आयकर विभागाच्या छापेमारीला राजकीय कंगोरे असल्याचीही चर्चा रंगली होती.