हैदराबादच्या पंजगुट्टा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपतीला त्यांच्या नातवाने मालमत्तेचा वादातून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील 86 वर्षीय उद्योगपती वेलमती चंद्रशेखर जनार्दन राव यांचे नातू कीर्ती तेजा याने निघृण हत्या केली आहे. मालमत्तेवरून झालेल्या वादानंतर गुरुवारी मध्यरात्री 28 वर्षीय कीर्ती तेजाने त्याचे आजोबा व्हीसी जनार्दन राव यांच्यावर चाकूने तबब्ल 73 वेळा वार केले. या घटनेच्या वेळी त्याची आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर आरोपीने आईवरही चाकूने वार केला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली आहे. राव हे वेलजन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) होते.
आरोपीची आई जखमी झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शनिवारी आरोपीला अटक करण्यात आल्याच पोलिसांनी सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शहराच्या दुसऱ्या भागात राहणारे तेजा आणि त्याची आई गुरुवारी सोमाजीगुडा इथे रावच्या घरी गेले होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तेजाची आई कॉफी घेण्यासाठी गेली तेव्हा तेजा आणि राव यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद झाला.
प्राथमिक तपासात समोर आलं की, तेजाने चाकू काढून आजोबांवर 'हल्ला' केला. लहानपणापासूनच त्याच्या आजोबांचे त्याच्याशी वागणे चांगले नव्हते आणि तो मालमत्तेचे वाटप करण्यास 'नाकार' देत होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे नेमकी संख्या निश्चित झाली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी नुकताच अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी पूर्ण करून हैदराबादला परतला होता.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितलंय. वेलजानच्या वेबसाइटनुसार, 1965 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी जहाजबांधणी, ऊर्जा, मोबाईल आणि औद्योगिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांसाठी संपूर्ण उपाय प्रदान करण्यात माहिर आहे.