Vande Bharat Sleeper Train: भारतातील पहिली सर्वात सुपर स्पेशल ट्रेन लाँच होणार आहे. ही ट्रेन वंदे भारत ट्रेनच सुपर मॉडेल असणार आहे. ही ट्रेन 16 किंवा 18 नाही तर तब्बल 24 डब्यांची असणार आहे. म्हणजेच एक संपूर्ण गाव या ट्रेनमधून प्रवास करु शकेल. या स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना जबरदस्त सोई सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणेज भारतातील अनेक महत्वाच्या आणि अतिजलद रेल्वे मार्गावर ही 24 डब्यांची वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे.
सध्या वंदे भारत ही भारातातील सर्वात जलद आणि अलिशान ट्रेन आहे. भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या 540 किमी मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पहिल्या 16 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनने 15 जानेवारी 2025 रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) कडून घेण्यात आलेली कठोर चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. यानंतर आता रेल्वे थेट 24 डब्यांची स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
24 डब्यांची स्लीपर वंदे भारत ट्रेन ही भारतातील शाही ट्रेन असेल. 16 कोचच्या स्लीपर वंदे भारतमध्ये तीन वर्ग आहेत. एसी फर्स्ट, एसी सेकंड आणि एसी थर्ड. त्याची एकूण प्रवासी क्षमता 1692 इतकी आहे. मात्र, याला आठ कोच जोडल्याने त्याची प्रवासी क्षमता 1692 इतकी होईल. आतापर्यंत कोणत्याही लक्झरी ट्रेनमध्ये इतकी प्रवासी क्षमता नाही.
ही ट्रेन सध्याच्या वंदे भारतपेक्षा अधिक आधुनिक असणाैर आहे. या ट्रेनमध्ये एअर कर्टन, क्रॅश बफर, फायर बॅरियर वॉल, पॅडेड बर्थ आणि ऑनबोर्ड वायफाय सारख्या सुविधा मिळणार आहेत. भारतीय रेल्वेने 17 डिसेंबर2024 रोजी 24 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटच्या 50 रॅकसाठी प्रोपल्शन इलेक्ट्रिकची मोठी ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर दोन आघाडीच्या भारतीय उत्पादकांना देण्यात आली आहे.