MLA Uday Samant On Rajan Salvi: राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरणार का? यावर सध्या कोकणाच्या बांधावर चर्चा सुरु आहेत. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केलं. 'प्रत्येकाच्या मनामध्ये काय असतं हे कोणी सांगू शकत नाही. मला कुठे जायचं आहे माझ्या मनाने नक्की केलेलं असतं. त्याच्यामुळे परवाची दिल्लीची पत्रकार परिषद आम्ही सर्वांनीदेखील बघितली. वज्रमुठ आहे म्हणून सांगितले. ती किती दिवस टिकते ते आपण बघू. त्यांनी आवाहन दिल्यावर त्याला प्रति आव्हान दिलं पाहिजे अशातला भाग नाही, असे ते म्हणाले. ज्यावेळी शिवसेनेच्या बाबतीमधली भूमिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकांना पटली. बाळासाहेबांचा वारसा आणि विचार पुढे नेणारे शिंदे आहेत, हे विधानसभेनंतर एकदा पुन्हा सिद्ध झालं.दहा ते बारा माजी आमदार, खासदारकीचे उभे असलेले काही उमेदवार आमदारकीचे काही उमेदवार एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारतील, असे मी सांगितले होते. याची प्रोसेस सुरु झाल्याचे ते म्हणाले.
या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेसोबत माझी चर्चा झालेली नाही. आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्यानंतर ते पक्षांमध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत, त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. किरण सामंतर त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टीचा विचार झाल्यावरच एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे ते म्हणाले. सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी महाराष्ट्रात फार मोठी मुव्हमेंट सुरू आहे.त्याचे पडसाद तुम्हाला बघायला मिळतील, असे ते म्हणाले. माझ्याकडे 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंचा आभार दौरा आहे. त्यामध्येदेखील मोठे प्रवेश होणार आहेत. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. शेवटी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आम्हाला शिवसेना वाढवायची आहे. मला असं वाटतंय ज्या पद्धतीने अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंनी पायाला भिंगरी महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा काम केलं त्याचा प्रतिसाद मिळतोय. त्याच आउटपुट आम्हाला मिळतय. संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे. काल अनेक खुलासे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र समोर आणलेले आहेत. कशा पद्धतीने एखाद्याला बदनाम केले, हे कशा पद्धतीनें खोटं बोललं जातं? हे कालच्या मुलाखतीमधून देवेंद्रजींनी स्पष्ट केला आहे. काही घडलेलं नव्हतं तिथे देवेंद्रजीना बाहेर ठेवण्यात आलं होतं. अमित शाह याबद्दल बोलले होते.त्याचे खुलासे काल देवेंद्रजींनी केल्याचे सामंत म्हणाले.
पराभव झाल्यानंतर केजरीवालांची मुलाखत आपण बघितली तर त्यांनी आपला पराभव मान्य केला. त्यांच्या मुलाखतीतून लोकशाहीला सन्मान केला पाहिजे दिसून आलं. त्यांनी कबूल केलं त्यांचा पक्षाचा पराभव झाला. ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान मुंबई पालिकेमध्येसुद्धा महायुतीचे सत्ता येईल हे निश्चित असल्याचा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला.
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कोर्टात प्रकरम सुरू आहे. काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे. त्या चौकशीत जे काही निष्पन्न होणार आहे त्यांना फासावर लटकवलं पाहिजे अशी भूमिका आहे. पण जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेबद्दल बोलणं योग्य होणार नाही. पण प्रत्येक मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे हे नक्की, असे ते म्हणाले.