Pritam Chakraborty Cash Steal : बॉलिवूडचा लोकप्रिय म्यूजिक दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, कथीतपणे प्रीतमच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जवळपास 40 लाख रुपयांची रोख रक्कम चोरली. ही घटना नुकतीच समोर आली आहे. त्यानंतर प्रीतमनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर याविषयी अधिकृत तपास सुरु आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आता मलाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत म्हटलं आहे की प्रीतमसाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं त्याच्या ऑफिसमधून 40 लाखांची रोख रक्कम चोरली आहे. या घटनेची माहिती प्रीतमच्या मॅनेजरनं दिली आहे. त्याला चोरीविषयी कळतात त्यानं अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. पोलिसांनी संशयिताची माहिती दिली असून आशिष सयाल असं त्याचं नाव असून त्याचं वय 32 वर्ष आहे. त्याला पकडण्यासाठी त्यांनी एक टीम देखील बनवली आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही चोरी प्रीतम चक्रवर्तीच्या गोरेगाव येथे असलेल्या म्यूजिक स्टूडियो युनिमस रेकॉर्ड प्रायव्हेट लिमिटेडमधये 4 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता झाली. प्रोडक्शन हाउसच्या एका व्यक्तीनं प्रीतमचा मॅनेजर विनीत चेड्डाला 40 लाख रुपये रोख असलेली एक बॅग दिली होती. त्यावेळी तिथे आशीष सयाल, अहमद खान आणि कमल दिशा देखील उपस्थित होते. अधिकारी आता ही चोरी कशी झाली असेल त्या सगळ्या परिस्थितीचा आठाव घेत तपास करत आहेत आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी करत आहेत.
एका अधिकाऱ्यानं सांगितलं मॅनेजरनं रोख रक्कम घेऊन ती ऑफिसमध्ये एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवली आणि त्यानंतर तो प्रीतम चक्रवर्तीच्या घरी गेला. तो त्याच बिल्डिंगमध्ये राहतो ही. जेणे करून काही डॉक्युमेंट्सवर त्याची सही घेता येईल. जेव्हा तो परतले तेव्हा त्यानं पाहिलं की ट्रॉली बॅग ही गायब आहे. त्यानं लगेच दुसऱ्या लोकांना विचारलं, तर त्यांनी दावा केला की ती बॅग आशिष सयाल घेऊन गेला आणि सांगितलं की ती बॅग तो प्रीतम चक्रवर्तीच्या घरी घेऊन जात आहे.
हेही वाचा : 'लग्न, घटस्फोट आणि प्रसुती...'; करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केली भावूक पोस्ट
पोलिसांनी स्वत: खुलासा केला की मॅनेजरनं संशय असलेल्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं फोन उचलला नाही. तर संशयीतनं त्याचा फोन बंद ठेवला आहे. तर त्यामुळे त्याच्यावर असलेला संशय आणखी वाढला आहे. काही गडबड झाल्याचं समजताच मॅनेजरनं लगेच प्रीतम चक्रवर्तीला संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यानं लगेच अधिकाऱ्यांना तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर त्याच्या मॅनेजरनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि संशयीत व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रीतमनं या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.