लग्नाची तारीख ठरली, वधूही तयार झाली... पण 'या' क्रिकेटपटूने संघासाठी केला मोठा त्याग

SA20 Final: एका खेळाडूचे फायनलच्या दिवशी लग्न होणार होते, परंतु त्याने संघासाठी खूप मोठा निर्णय घेतला.     

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 9, 2025, 11:10 AM IST
लग्नाची तारीख ठरली, वधूही तयार झाली... पण 'या' क्रिकेटपटूने संघासाठी केला मोठा त्याग  title=

MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape: क्रिकेट या खेळाचे जगभरात चाहते आहेत. अनेक वेळा क्रिकेटपटू या खेळासाठी मोठा त्याग करायला मागेपुढे पाहत नाहीत. या खेळासाठी हवी ती गोष्टी करायला तयार असतात. भले मग ते एखाद्या खेळाडूचे लग्न असले तरी. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड बेडिंगहॅमसोबत (david bedingham) घडला. त्याने आपल्या संघाच्या एका महत्त्वाच्या सामन्यासाठी मोठा त्यात केला. वास्तविक, डेव्हिड बेडिंगहॅम दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये सनरायझर्स इस्टर्नकडून खेळतो. डेव्हिड बेडिंगहॅमचे लग्न ८ जानेवारीला निश्चित झाले होते आणि त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा अंतिम सामनाही होणार होता.

लग्नाची पूर्ण तयारी झाली होती पण...

सनरायझर्सचा सलामीवीर डेव्हिड बेडिंगहॅमला कदाचित आपला संघ अंतिम फेरी गाठता येणार नाही असे वाटले होते. याच कारणामुळे त्यांने लग्नाची तारीख निश्चित केली. लग्नाची पूर्ण तयारीही करण्यात आली आहे, मात्र अंतिम सामन्यात संघ गेला. नेमकं त्याच दिवशी लग्न होते. त्यामुळे त्याने लग्न एक दिवस पुढे ढकलून सामना खेळायला आला. त्याने संघासाठी हा मोठा त्याग केला.  डेव्हिड बेडिंगहॅम आपल्या संघाकडून अंतिम फेरीत खेळला, पण तो काही विशेष खेळ दाखवू शकला नाही. अंतिम सामन्यात बेडिंगहॅमला केवळ 5 धावा करता आल्या.

हे ही वाचा: Champions Trophy: भारताला हरवण्याचे स्वप्न पाहतोय पाकिस्तान! पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले - खरे युद्ध तर...

 

अंतिम फेरीत सनरायझर्स इस्टर्न केपची खराब कामगिरी

एमआय केपटाऊनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांचा निर्णयही योग्य ठरला. एमआय केपटाऊनने 20 षटकांत 8 गडी गमावून 181 धावा केल्या.यादरम्यान कॉनर एस्टरह्युझेनने सर्वाधिक 39 धावा केल्या आणि डेवाल्ड ब्रेव्हिसने 38 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स इस्टर्न केपची कामगिरी अत्यंत खराब केली आणि 18.4 षटकात 105 धावा करून सर्वबाद झाले.