Easily Remove upper lip hair: ओठााच्या वरील भागात असलेले अनावश्यक केस महिलांच्या चेहेऱ्यावर खूप विचित्र दिसतात. म्हणून बर्याच महिलांना अपर लिप्सवरील अनावश्यक केस काढावेसे वाटतात. हे केस काढण्यासाठी बहुतांश महिला थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करतात, पण हे दोन्ही उपाय वेदनादायक असतात. एवढेच नाही तर यामुळे त्वचा कोरडी बनते आणि आणि सुरकुत्या येऊ लागतात.
तुम्हाला देखील कोणत्याही दुःखापतीशिवाय आणि सुरक्षित पद्धतीने अपर लिप्सवरील केस काढायचे असतील, तर स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक पदार्थ उपयोगी ठरू शकतात. आत्ताच या नैसर्गिक उपायांबद्दल जाणून घेऊया.
बेसन हे नैसर्गिक क्लीनिंगचे काम करते. ओठांच्या वरील भागातील केस काढण्यासाठी बेसन आणि दूध यांचा वापर करू शकता.
कसा करावा वापर?
1. एका वाटीत थोडेसे बेसन घ्या.
2. त्यात थोडे दूध टाकून घट्ट पेस्ट तयार करा.
3. ही पेस्ट अपर लिप्सवर लावा
4. पेस्ट पूर्णपणे वाळल्यावर हलक्या हाताने स्क्रब करा.
5. हळूहळू केस निघून जातील आणि त्वचा मऊ आणि स्वच्छ दिसेल.
मध आणि साखर यांच्या मिश्रणाने देखील अपर लिप्सवरील केस सहज काढता येतात.
कसा करावा वापर?
1. एका वाटीत थोडेसे मध घ्या.
2. त्यात जाडसर दळलेली साखर मिसळा.
हे ही वाचा: डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे तर माहिती असतात; पण, हे दुष्परिणाम एकदा वाचाच
3. हे मिश्रण अपर लिप्सवर लावा आणि काही वेळ तसेच ठेवा.
4. नंतर हलक्या हाताने स्क्रब करा.
5. नियमित केल्यास केस नैसर्गिकरित्या कमी होतील.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)