मित्रांसमोर मुलीला केलं प्रपोज, नकार देताच आधी मिठाईचा बॉक्स फेकून मारला अन् नंतर...; धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral Video: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अमरोहा येथील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण मुलीसह गैरवर्तवणूक करताना दिसत आहे. 'प्रपोझ डे'च्या (Propose Day) दिवशी ही घटना घडली आहे.      

शिवराज यादव | Updated: Feb 9, 2025, 01:07 PM IST
मित्रांसमोर मुलीला केलं प्रपोज, नकार देताच आधी मिठाईचा बॉक्स फेकून मारला अन् नंतर...; धक्कादायक VIDEO व्हायरल title=

Viral Video: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सर्व प्रत्येकजण आपल्या प्रेमाची कबुली देत असतं. यावेळी काहींना त्यांचं प्रेम मिळतं, तर काहींच्या पदरी मात्र निराशा येते. पण यावेळी 'प्रपोझ डे' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील गजरोला पोलीस ठाणे क्षेत्रात एका तरुणाने एका तरुणीला प्रपोज केलं. यावेळी तरुणीने नकार देताच तरुणाने रागात तिच्या कानाखाली लगावली.  यानंतर त्याने तिच्यासाठी आणलेली मिठाई तिच्या अंगावर फेकून दिली. हे पाहिल्यानंतर नेटकरी संतापले आहेत. 

 व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सोशल मीडियावर तरुणाविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला असून, प्रशासनाकडे मुलीला लवकरात लवकर न्याय दिला जावा अशी मागणी करत आहेत. 

व्हिडीओत दिसत आहे की, एक तरुण मुलीला प्रपोज केलं आहे. पण जेव्हा ती नकार देते तेव्हा ते रागात मिठाई फेकून देतो. तो मिठाईचा डबा तरुणीच्या अंगावर फेकून देतो. यावेळी त्याच्यासह असणारे त्याचे मित्र ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत असतात. तरुणाने तरुणीच्या डोक्यावर जोरात फटकाही मारला. हे सर्व घडत असताना त्याचे मित्र थांबवण्याऐवजी व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु ठेवतात. तरुणी यावेळी फक्त हतबलपणे रडताना दिसत आहे. 

आरोपीने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आहे. यामुळे लोक संतापले असून कडक कारवाईची मागणी करत आहेत. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी आणि स्थानिक नाराज झाले असून कडक कारवाईची मागणी करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, "मुलीने नाही म्हटलं म्हणजे तिला मारण्याचा हक्का मिळतो का? ही गैरवर्तवणूक सहन केली जाऊ शकत नाही". तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे, जेणेकरुन ते पुन्हा असं करणार नाहीत. 

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरु केला असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा घटना रोखण्यासाठी कडक कारवाई केली जाईल, जेणेकरुन भविष्यात असं कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.