प्रसिद्ध गायिकेने 4 मुलांच्या बापाशी केल लग्न, 45 भाषांमध्ये गायलीयेत 50 हजारांपेक्षा जास्त गाणी

Famous Singer : लोकप्रिय गायिकेनं विवाहीत आणि 4 मुलं असणाऱ्या वायोनलिस्टशी लग्न केलं. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 9, 2025, 03:44 PM IST
प्रसिद्ध गायिकेने 4 मुलांच्या बापाशी केल लग्न, 45 भाषांमध्ये गायलीयेत 50 हजारांपेक्षा जास्त गाणी  title=
(Photo Credit : Social Media)

Famous Singer : कोणताही चित्रपट असो त्यात म्युजिक अर्थात गाणं हे असतंच. त्याच्याशिवाय भावना व्यक्त करणं सोपं होतं. चित्रपटसृष्टीत अनेक लोकप्रिय गायक आहेत, ज्यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. त्यापैकी एक गायकाविषयी आज आपण बोलणार आहोत. ज्यांनी विवाहीत आणि चार मुल असणाऱ्या कलाकारावर प्रेम केलं. त्यांनी अनेक लोकप्रिय गायकांसोबत काम केलं. त्यातही 45 भाषांमध्ये 50 हजार पेक्षा जास्त गाणी गायली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही गायिका कोण आहे. त्यांच्याविषयी आज जाणून घेणार आहोत. 

ही गायिका दुसरी कोणी नसून कविता कृष्णमूर्ति आहेत. त्यांचं खरं नाव हे शारदा होतं. तमिळ कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून त्यांचं कुटुंब हे दिल्लीत राहत होतं. त्यांचे वडील हे एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये काम करत होते. तर तिची काकू प्रतिमा भट्टाचार्ज यांच्या सांगण्यानंतर कविता यांनी गाण्याचे धडे घेण्यास सुरुवात केली. 8 वर्षाच्या असताना म्यूजिक कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालं.

कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर 1971 मध्ये बंगाली चित्रपट Shriman Prithviraj मध्ये त्यांनी गाणं गायलं. त्यावेळी त्यांनी हे गाणं लता मंगेशकर यांच्यासोबत गायलं. हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गाण्यासाठी त्या 14 वर्षांच्या असताना मुंबईत आल्या. त्यांनी इथे त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये वार्षिक स्नेह संमेलनात त्यांची भेट हे हेमंत कुमार यांचा मुलगा रानू मूखर्जी यांच्यासोबत झाली. रानू यांनी कविता यांची ओळख त्यांच्या वडिलांशी करुन दिली. काही परफॉर्मेन्सनंतर मन्ना डे यांनी एका जाहिरातीसाठी जिंगल गाण्याचं काम दिलं. 

काकूच्या ओळखीमुळे कविता या हेमा मालिनीची आई जया चक्रवर्ती यांना भेटल्या. त्यांनी त्यानंतर त्यांची भेट लक्ष्मीकांतशी करून दिली. त्यानंतर 1976 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. त्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर हिंदी गाणी गाऊ लागले. कविता यांनी हिंदी, बंगाली, कन्नड, राजस्थानी, भोजपुरी, तेलगू, उडिया, मराठी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, मल्याळम, गुजराती, नेपाळ, पंजाबीसोबत इतर 45 भाषांमध्ये 50 हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांना 2005 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

हेही वाचा : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये चोरी, कर्मचाऱ्यानं लंपास केले 40 लाख रुपये

कविता यांच्या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर त्यांनी 1999 मध्ये बंगळुरुमध्ये L. Subramaniam यांच्याशी लग्न केलं. L. Subramaniam यांचं आधीच लग्न झालेलं होतं आणि त्यांना 4 मुलं देखील होती. L. Subramaniam यांच्या पहिल्या लग्नातून असलेली मोठी मुलगी ही कंपोजर आहे. मुलानं लॉ चं शिक्षण घेतलं आहे आणि तो सॉन्ग रायटर देखील आहे. तिसरा मुलगा हा डॉक्टर आहे आणि चौथा मुलगा हा वायोलिन वाजवतो. कविता यांना स्वत: चं मुलं नाही. 67 व्या वर्षी नवऱ्यासोबत म्यूजिक इंस्टीट्यूट चालवत आहेत.