Apple iPhone SE 4 : Apple चा सर्वात स्वत iPhone पुढच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. ग्राहक अनेक महिन्यांपासून या बहुचर्चित फोनच्या लाँंचिगची वाट पाहत आहेत. या फोनची स्टार्टिंग प्राईज 43 हजार रुपये इतकी आहे. Android फोनला टक्कर देण्यासाठी Apple हा स्वस्त फोन लाँच करत आहे. जाणून घेऊया या फोनचे फिचर्स.
iPhone SE 4 असे या फोनचे नाह आहे. या Apple कंपनीचा मोस्ट अवेटेड फोन मानला जात आहे. सध्या Apple आयफोनची 16 सिरीज आहे. Apple iPhone 17 लाँच करण्याआधीच कंपनी हा बजेट फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात Apple iPhone SE 4 लाँच होऊ शकतो.
Apple iPhone SE 4 या फोनचे फ्रंट डिजाईन हे iPhone14 सारखे असल्याचा दावा केला जात आहे. iPhone SE 4 फोनमध्ये Apple A18 बायोनिक प्रोसेसर दिला जाऊ शकतो. iPhone 16 सिरीजमध्ये हाच प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यामुळे या फोनमध्ये इतर आयफोन प्रमाणेच दमदार परफॉर्मन्स मिळणार आहे. हा फोन iPhone SE सिरीजमधील सर्वात पावरफुल फोन ठरु शकतो.
iPhone SE 4 फोनमध्ये 8 जीबी रॅम मिळेल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फ्रंटमध्ये 24 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.
iPhone SE 4 फोनमध्ये 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. आजपर्यंतच्या सर्व iPhone SE मॉडेल्समध्ये एलसीडी स्क्रीन देण्यात आली होती. या फोनमध्ये नॉच असू शकतो किंवा डायनॅमिक आयलंड फीचर देखील असू शकते असा दावा केला जात आहे.