Sewri-Worli Elevated Connector: मुंबईकरांचा प्रवास अगदी जलद आणि सुलभ होणार आहे. अटल सेतू हा थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे. नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना देखील याचा फायदा होणार आहे. यासाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (MMRDA) शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर (SWEC) तयार करत आहे. या अंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 3 हजार मेट्रिक टनाचा डबल डेकर पूल उभारला जाणार आहे.
अटल सेतू आणि वांद्रे-वरळी सी लिंक या दोन सागरी मार्गांना डायरेक्ट तसेच सिग्नल-फ्री कनेक्टिव्हिटी असण्यासाठी कनेक्टर हा मार्ग काम करणार आहे. नवी मुंबई ते मध्य आणि दक्षिण मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना याचा अधिक फायदा होणार आहे. दररोज कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्यांच्या वेळेची बचत होईल. यासोबतच त्यांना सिग्नल, ट्रॅफिकमुक्त प्रवास करता येणार आहे.
शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर हा मुंबईच्या कनेक्टिव्हिटीचा कायापालट करणार आहे. शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर अटल सेतूसाठी एमएमआरडीएच्या ट्रॅफिक डिस्पर्सल सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या मुंबईची वाहतूक अधिक गतीशील करणार आहे. हा 4.5 किमी, 4-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर अटल सेतूला वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाशी थेट जोडणार आबहे. यामुळे अटल सेतू ते वांद्रे-वरळी सी लिंक असा अखंड प्रवास करता येणार आहे.
यामुळे मध्य आणि दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या नवी मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सिग्नलमुक्त तसेच वेळेची बचत करणारा होणार आहे. वांद्रे-वरळी आणि मुंबई कोस्टल रोडवरून अटल सेतूपर्यंत सुमारे 15 ते 20 टक्के वाहतूक थेट अटल सेतूकडे वळवता येणार आहे.
शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर हा अभियांत्रिकी पराक्रम ठरणार आहे. प्रभादेवी स्टेशनवर 3 हजार मेट्रिक टन वजनाचा डबल डेकर रोड ओव्हर ब्रिज (ROB) उभारला जाणार आहे. हा डबल डेकर ब्रीज मध्य आणि पश्चिम दोन्ही रेल्वे मार्ग ओलांडणारा असमार आहे. यामुळे जास्तीत जास्त सुरक्षिततेसाठी प्रगत पुश-पुल पद्धतीचा वापर करून हा डबल डेकर ब्रीज बांधला जाणार आहे.