शिरीष महाराजांनी ज्या कारणासाठी केली आत्महत्या, ती इच्छा आता होणार पूर्ण!

Eknath Shinde On Shirish Maharaj:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 9, 2025, 06:09 PM IST
शिरीष महाराजांनी ज्या कारणासाठी केली आत्महत्या, ती इच्छा आता होणार पूर्ण! title=
शिरीष महाराजांची इच्छा पूर्ण

Eknath Shinde On Shirish Maharaj: तुकाराम महाराजांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार  शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन अकाली जीवन संपवल्याने देहू नगरीत मोठी हळहळ व्यक्त केली गेली होती.

दिवंगत मोरे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत घेऊन त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे.

आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला साद देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.

4 चिठ्ठ्यांमध्ये सापडलं कारण!

'माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे. पैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या.' अशी विनंती महाराजांनी मित्रांना केली. 'मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची ही महाराजांनी माफी मागितली. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग'. असं ही चिठ्ठीत नमूद केलेलं आहे.

आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक

तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार..हे गाणे गात आशा भोसले यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. 'मी तुमच्यासाठी गातेय...तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वर आलात. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही काम करता. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही परत अभिमान वाटतो. ज्यावेळी सर्वच निवळलं होते. सर्व तुमच्यावर धावून आले होते. तुम्ही सर्वांना उत्तर दिलंत. तुम्ही यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुम्हाला आशीर्वाद देतेय. तुम्ही ऐकत असाल भाषण किंवा नसाल ऐकत. असेच काम करत राहा. चांगले काम केल्याने कोणीही कधी संपत नाही.', असेही त्यापुढे म्हणाल्या.