माकडांना आधीच कळले की भूकंप येणार?

नैसर्गिक आपत्तीपूर्वी पक्ष आणि प्राण्यांना चाहूल लागते असे म्हणतात, असे काहीसे घडले आहे आग्र्यामध्ये... नेपाळ आणि उत्तर भारतात शनिवारी झालेल्या प्रलयकारी भूकंपाची कुणकूण माकडांना आधीच लागली होती का असा प्रश्न आग्र्यातील एका रहिवाशाला पडला आहे. 

Updated: Apr 27, 2015, 02:35 PM IST
माकडांना आधीच कळले की भूकंप येणार?

आग्रा : नैसर्गिक आपत्तीपूर्वी पक्ष आणि प्राण्यांना चाहूल लागते असे म्हणतात, असे काहीसे घडले आहे आग्र्यामध्ये... नेपाळ आणि उत्तर भारतात शनिवारी झालेल्या प्रलयकारी भूकंपाची कुणकूण माकडांना आधीच लागली होती का असा प्रश्न आग्र्यातील एका रहिवाशाला पडला आहे. 

आग्रा येथील बेलनगंजमध्ये राहणाऱ्या पद्मिनी यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ५० माकडं झाडांवरून खाली उतरुन आमच्या  घराजवळ अस्वस्थ आणि निराश होऊन बसले होते. त्या माकडांना आम्ही तिथून हाकलवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 

विशेष म्हणजे इतर वेळी ते प्रतिकार करतात, किंवा तेथून निघून जातात पण असे काहीच झाले नाही. 
पण दुपारी १२ च्या सुमारास भूकंप झाला आणि घराजवळ जमलेले माकडं तिथून निघून गेले. त्यामुळे माकडांना भूकंपाची चाहूल लागली होती का, असा प्रश्न आग्र्यातील नागरिकांना पडला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.