खासदार गायकवाड यांच्या अटकपूर्व जामीनासाठी हालचाली

शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचा लपंडाव अद्याप संपलेला नाही. ते आज लोकसभेत हजर राहणार का याबाबत साशंकता आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 29, 2017, 08:39 AM IST
खासदार गायकवाड यांच्या अटकपूर्व जामीनासाठी हालचाली title=

नवी दिल्ली : शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचा लपंडाव अद्याप संपलेला नाही. ते आज लोकसभेत हजर राहणार का याबाबत साशंकता आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बैठक घेऊन रविंद्र गायकवाड प्रकरणी संसदेत काय भूमिका मांडायची हे ठरवणार आहेत.

तसंच खासदार रविंद्र गायकवाड यांना दिल्लीत आल्याबरोबर अटक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत.

शिवसेनेने दाखल केला हक्कभंग

खासदार रविंद्र गायकवाडप्रकणी शिवसेनेने लोकसभेत हक्कभंग दाखल केलाय. हा हक्कभंग लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला तर गायकवाड यांना आपली बाजू लोकसभेत मांडता येणार आहे. यात एअर इंडियाच्या कर्मचा-यांनी गायकवाड यांना केलेली मारहाण आणि विमान कंपन्यांनी घातलेली बंदी यावरून शिवसेना आक्रमक होणार आहे..

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घालणा-या विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेनं लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय. शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हा हक्कभंग दाखल केलाय. यासंदर्भात शिवसेना खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री गजपती राजू यांच्याशी चर्चा केली.  हा प्रस्ताव आज चर्चेला येण्याची शक्यता आहे.