www.24taas.com,नवी दिल्ली
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी हे आपल्या पदाचा राजीनामा देतील ही बातमी साफ चुकीची आणि निराधार आहे. गडकरी यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिले.
गडकरी हे राजीनामा देतील असे वृत्त चर्चिले जात होते. शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत गडकरींच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक तब्बल दीड तास ही बैठक चालली. या बैठकीत गडकरींनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा केला. पक्ष जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं मत गडकरींनी स्पष्ट केलं आहे.
नितीन गडकरींनी शेतकऱ्यांची जमीन लाटली असा गौप्यस्फोट करून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमने राजकीय वातावरण तापविले. गडकरींनीही आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या पाठीशी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज, अरूण जेटली धावून आले. तर लालकृष्ण अडवाणीही मैदानात उतरले. गडकरीप्रकरणी संघानेही अभय दिले होते. तो पक्षाचा निर्णय असल्याचे म्हटले होते.
गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची प्रकरण रोजरोज बाहेर येऊ लागल्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली. पूर्ती ग्रुपमध्ये १९ बेनामी कंपन्या आणि त्यांचे पत्ते मुंबईतील झोपडपट्टीत असल्याचं समोरं आलं. मात्र तरी सुद्धा संघाने आरोपांचे खंडन करत गडकरींच्या माफ केल्यात.
भाजपची कोअर कमिटीच्या बैठकीत गडकरींना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले. त्यामुळे नियोजीत कार्यक्रमाप्रमाणे गडकरी उद्यापासूनहिमाचल दौर्या्वर जाणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. गडकरींच्या राजीनाम्याचा प्रश्न नाही असं जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.