नवी दिल्ली : भारतात मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते. मतदाराने मतदान केल्याची ती खूण असते. मात्र आता शाई लावण्यासाठी ब्रशऐवजी मार्करचा वापर केला जाणार आहे.
निवडणूक आयोगाने शाई बनवणाऱ्या मैसूर पेंटसने उपलब्ध केलेल्या मार्करची चाचणी सुरु केली आहे. मतदार आणि विशेष करुन युवा मतदारांनी दिलेल्या सल्ल्यानंतर निवडणूक आयोग ही पावले उचलत आहे. ब्रशने लावण्यात आलेले शाईचे निशाण स्पष्ट नसते. यामुळे मार्करचा वापर केल्यास योग्य पद्धतीने शाई लावली जाईल, असे मतदारांचे म्हणणे आहे.
अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हा प्रयोग करण्यात आला. 'सध्या मार्करच्या वापराबाबतची चाचणी सुरु आहे. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही,' असे निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याने यावेळी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.