काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आता गेले कुठे?

काश्मीर महापुरात फुटीरतावादी कुठेतरी नाहीसे झाले आहेत. कायमच सरकारविरोधात आक्रमक होणारे हे फुटीरतावादी नेते कुठे गायब झाले, कुणालाचं माहित नाही. त्यामुळेच हे फुटीरतावादी नेते गेले कुठे असा सवाल उपस्थित होतोय. त्याचप्रमाणे लपून दगडफेकीचं प्लानिंग तर करत नाहीत ना ?  

Updated: Sep 14, 2014, 04:53 PM IST
काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आता गेले कुठे? title=

जम्मू-काश्मीर : काश्मीर महापुरात फुटीरतावादी कुठेतरी नाहीसे झाले आहेत. कायमच सरकारविरोधात आक्रमक होणारे हे फुटीरतावादी नेते कुठे गायब झाले, कुणालाचं माहित नाही. त्यामुळेच हे फुटीरतावादी नेते गेले कुठे असा सवाल उपस्थित होतोय. त्याचप्रमाणे लपून दगडफेकीचं प्लानिंग तर करत नाहीत ना ?  

ही भावनीक दृश्य आहेत जम्मू-काश्मीरमधील भारतीय जवानांनी दाखवलेल्या माणूसकीची, जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीविरोधात हा भारतीय जवानांचा लढा आहे...
 
मात्र आज काही लोकांवर आणि संघटनांवर मोठे प्रश्न उपस्थित केले जातायत. जे काश्मीर प्रश्नावर मोठ-मोठी विधानं करायचे ते आहेत कुठे असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. जवानांवर दगडफेक करणारे लोक आहेत कुठे ? भारतीय जवान आणि भारत सरकारविरोधात कायमच अपशब्द बोलणारे लोक आहेत तरी कुठे ? कुठे गेली काश्मीरची अँटी आर्मी ब्रिगेड?
 
जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्य़ा आपत्तीशी भारतीय जवान दोन हात करतायत. आणि कायमच काश्मीर आमचा आहे असं सांगणा-यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. कुठे आहेत सय्यद अली शाह गिलानी, यासिन मलिक सारखे नेते.

ज्यांचा अजेंडा हा काश्मीरच्या जनतेपेक्षा पाकिस्तानमधील राजकारण असायचा. हे ते लोक आहेत जे कायम पाकिस्तानचा दरवाजा ठोठावत असतात. भारतानं पाकिस्तानशी चर्चेला नकार दिल्यामुळे यांना त्रास होतो. मात्र,  जम्मू-काश्मीरमधील नागरिंकावर ओढवलेल्या संकटानंतर यांना काहीच कस वाटलं नाही? 
 
हे जे लोक आहेत ते देशाच्या शत्रुंबरोबर उठबस करतात. इस्लामाबादमध्ये हाफिज सईद या आतंकवाद्याबरोबर यासिन मलिकला सा-या जनतेनं पाहिलं. आज काश्मीर संकटात आहे मात्र यासिन मलिक केवळ फोटो काढून औपचारिकता पूर्ण करतायत. यासिन मलिकला वाचवण्यासाठी आतंकवादी हाफीज सईदही आला नाही. 

पुरामध्ये सापडलेल्य़ा मलिकांना भारतीय जवानांनीच वाचवलं. कारण संकटसमीय आपलेच लोक कामी येतात.आज काश्मीरच्या अँटी आर्मी, अँटी इंडिया ब्रिगेडच्या राजकारणाचा पर्दाफाश झालाय. महापुरात या सगळ्यांचे चेहरे समोर आलेत. भारतीय जवान नसते तर काश्मीरी जनतेचं काय झालं असतं याची कल्पनाच न केलेलीच बरी ?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.