नवी दिल्ली : महागाईच्या आगीचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं भडका उडालाय. पेट्रोल-डिझेलचे दर महागले आहेत. त्यामुळं वाहनधारकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा दर वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर ३.०७ रुपयाने तर डिझेल १.९० रुपयाने महागले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागल्याने देशातही पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
गेल्या पाच महिन्यांतील पेट्रोलची ही दुसरी भाववाढ आहे; तर डिझेलची ऑक्टोबरनंतरची चौथी दरवाढ आहे.