उद्यापासून पुन्हा एकदा स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा कमी होण्याच्या मार्गावर आहेत. 

Updated: Jan 14, 2015, 01:12 PM IST
उद्यापासून पुन्हा एकदा स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा कमी होण्याच्या मार्गावर आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा दोन रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. हे नवे दर गुरुवारी रात्रीपासून लागू होऊ शकतात. या किंमती पुन्हा ढासळण्याचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या ढासळलेल्या किंमतीच आहेत. सध्या क्रूड ऑईलच्या एका बॅरलसाठी ४५ डॉलर इतका खर्च येतोय. 

यापूर्वी डिसेंबर महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांत प्रती २ रुपये लीटर घट झाली होती. मुंबईमध्ये पेट्रोल ६८.८६ रुपये प्रती लिटर तर डिझेल ५७.९१ प्रती लिटर आहे. तसंच, दिल्लीमध्ये पेट्रोल ६१.३३ रुपये तर डिझेल ५०.५१ रुपये प्रती लीटर आहे. 

नरेंद्र मोदी यांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी डिझेल सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यात आलं होतं. तर, प्रेट्रोलचे दर जून २०१२ मध्येच  नियंत्रणमुक्त करण्यात आले होते. 

नियंत्रणमुक्त झाल्यानंतर डिझेलमध्ये पाचव्यांदा कपात होतेय. तर ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलमध्ये झालेली ही नववी घट असेल.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.