www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रुपया, सोन्याची घसरण सुरू असताना आज पेट्रोलच्या दरात 1.82 पैशांची वाढ करण्यात आलीय. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्यामुळं तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळं पेट्रोलच्या दरात वाढ झालीय. इंधन दरवाढीवरचं केंद्र सरकारचं नियंत्रण हटलंय. त्यामुळं सातत्यानं दरवाढ होतेय. मात्र दरवाढीवर सवलत द्यायची असल्यास राज्य सरकारनं टॅक्समध्ये सवलत देण्याचा निर्णय घ्यावा.महिन्याभरात पेट्रोलच्या दरात तिस-यांदा वाढ झालीय. 1 जूनला 75 पैसे, 16 जूनला 2 रुपये वाढ झालीय आणि यापुढंही पेट्रोलच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यताय.
तसंच पुढच्या आठवड्यात डिझेलचे दरही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पेट्रोल दरवाढीमुळं सर्वसामान्य नागरिकांचं बजेट मात्र आणखीनच कोलमडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.