नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळ्या पैशाबाबत देशात छापा मारण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी कोट्यवधी तसेच लाखोच्या नोटा पकडण्यात येत आहे. याची माहिती सरकारला कशी मिळते, याची उत्सुका सर्वांनाच होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या फोन आल्यानंतर धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आलेय.
आयकर अधिकारी धडक कारवाई कशी करतात. त्यांना कोण माहिती देते, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र, या मागील खरे सत्य बाहेर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक फोन कॉल्स हे पंतप्रधान कार्यालयाला आलेत. आतापर्यत ६०० दरम्यान कॉल्स आलेत. या फोनची खातरजमा करुन या फोनवर मिळणारी माहिती ही इन्कम टॅक्स, प्रवर्तन निदेशालय आणि पोलीस यांनी दिली जाते. त्यानंतर पोलीस आणि इन्कम टॅक्स अधिकारी कारवाई करत असल्याचे पुढे आलेय.
पंतप्रधान कार्यालयाला दररोज किमान १० ते २० कॉल येतात. या कॉलद्वारे काळ्या पैशाबाबत माहिती मिळत आहे. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालयाला किमान ६०० फोन्स कॉल्स आले आहे. त्यामुळे नोटबंदीनंतर देशातील काळापैसा पकडण्यास मदत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत टाकण्यात आलेल्या छाप्यात १०० टक्के यश मिळाले आहे.